#RiverPollution पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय मोहिम राबवावी

#RiverPollution पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय मोहिम राबवावी
Updated on

कोल्हापूर - जिल्ह्यातील पंचगंगा नदी ही प्रदूषित झाली आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. यासाठी तातडीने पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय मोहिम राबवावी. शुध्दीकरणासाठी हजार कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशिल माने यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे केली. 

श्री. माने यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. इचलकरंजी येथील वस्त्रोउद्योग क्षेत्राचे पुनर्जीवन करणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी दर वाढवून मिळावेत या प्रमुख मागण्यांचाही यामध्ये समावेश आहे. 

यंत्रमागधारकांना पुनर्जीवीत करण्याची गरज

गेल्या अनेक वर्षांपासून इचलकरंजी शहर व परिसरात वस्त्रोद्योग अडचणीत आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या कापडाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामूळे यंत्रमाग धारकांना पुनर्जीवीत करण्यासाठी धोरणात्मक निर्णय अपेक्षीत आहे. सुती व मानव निर्मित धाग्यावरील जीएसटी दरात  जी तफावत आहे ती दूर करावी. आयात- निर्यात धोरणात योग्य बदल व्हावा. टीयूएफएस योजनेअंतर्गत सध्या १० टक्के अनुदान आहे ते पूर्वीप्रमाणे ३० टक्के करण्यात यावा अशी मागणी श्री. माने यांनी केली आहे.

एफआरपीत वाढ करावी

उसाच्या एफआरपीमध्ये वाढ करावी. ऊस उत्पादन खर्चात वाढ झालेली असून एफआरपी प्रमाणे बीले वेळेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे साखर कारखानेही आर्थिक अडचणीत आहेत. या समस्यांकडेही पंतप्रधानांनी लक्ष द्यावे अशी मागणी श्री. माने यांनी निवेदनातून केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Krishna River water level today in Sangli
Sangli FDA food inspection latest news
Tara Tigress Spotted Near Chandoli Dam Ring Road
Sangli Farmer Success Story Pomegranate Farming
Marathi News Esakal
www.esakal.com