खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामींना भोवळ

JaySiddheshwarSwami
JaySiddheshwarSwami
Updated on

अक्कलकोट : येथील संघ परिवार व समविचारी संघटनांतर्फे नागरिकत्व सुधारणा व नोंदणी कायद्याच्या समर्थनार्थ अक्कलकोट येथे भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी भाषण करत होते. भाषण झाल्यावर त्यांना चक्कर आली. त्यांना तेथील खासगी दवाखान्यात उपचार करून पुढे सोलापूरला पाठविण्यात आले असून, अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे समजते. या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सीएए व एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली

येथील श्रीमंत कमलाराजे चौकातील प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सीएए व एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून निघून कारंजा चौक, मेनरोड, कापड लाइन, समर्थ चौक, राजे फत्तेसिंह चौक मार्गे पुन्हा श्रीमंत कमलाराजे चौक येथे आली. रॅलीमध्ये खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, मैंदर्गीचे नीलकंठेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, दुधनीचे नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, नगरसेवक महेश हिंडोळे, तालुका संघचालक भीमराव साठे, जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, संघाचे गुरलिंगप्पा येळमेली, तालुका कार्यवाह संतोष वगाले, प्रसाद हारकुड, संदीप कटकधोंड, अनिल जकापुरे, चंद्रकांत दसले, डॉ. विपुल शहा, राजू हिप्परगी, शिवकुमार स्वामी, ऋषी लोणारी, कांतू धनशेट्टी, मोतीराम राठोड, व्यापारी महासंघाचे मल्लिनाथ साखरे आदींसह संस्था, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीमध्ये देशहितपर घोषणा देण्यात आल्या. रॅलीच्या समारोपप्रसंगी श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांची समयोचित भाषणे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Marathi News Esakal
www.esakal.com