गड किल्ल्यांवर हाॅटेल यावर खासदार संभाजीराजे म्हणाले....

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

कोल्हापूर - गडकिल्ल्यांचे हॉटेल कदापि होऊ देणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी आदेश मागे घ्यावेत, अशी परखड प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे. 

कोल्हापूर - गडकिल्ल्यांचे हॉटेल कदापि होऊ देणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी आदेश मागे घ्यावेत, अशी परखड प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानबिंदू असलेले २५ किल्ले हेरिटेज हाॅटेल्स व लग्न समारंभासाठी दिर्घ मुदतीच्या करारानं खासगी कंपन्यांना विकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. 

खासदार संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवर हॉटेल उभारण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे समजले. यावर तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या अशा निर्णयामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जातील.असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. 

महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे हे गडकिल्ले ! महाराजांचा चरणस्पर्श झालेला प्रत्येक किल्ला आम्हाला पवित्र आहे. गडांचे जतन - संवर्धन केले तर संपूर्ण जगभरातून हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी लोक येतील यातून स्थानिकांना रोजगार मिळेलच पण त्याचबरोबर समृद्ध वारसा जपण्याचे समाधान सुध्दा मिळेल, असेही खासदार संभाजीराजे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhajiraje Chhatrapati comment on hotel in fort