Video : घरी राहूनच करीत आहे कोरोनाशी सामना : खासदार श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य, टेस्टिंग किट, डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांच्यासाठी लागणारे सुरक्षा मास्क, कपडे, थर्मल स्कॅनर यासारखे हॉस्पिटलसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी वर्ग करण्यासाठी मान्यता कळवली आहे.

सातारा : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात; यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी 25 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे. खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी वर्ग केला जाणार आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला या निधीतून मोठी मदत होणार आहे. याबराेबरच नागरीकांनी घरी राहून काळजी घ्यावी तसेच जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले आहे. 
 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. हा लॉकडाऊन 21 दिवसांसाठीचा आहे. महाराष्ट्र सरकारनेही कडक निर्बंध आणले आहेत. सातारा जिल्ह्यात सद्यस्थिती दाेन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरस विरोधात संपूर्ण जिल्हा लढा देत आहेत. जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर असून कोरोना नियंत्रणासाठी कसोशीने प्रयत्नशील आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरती ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्वरित आरोग्य सेवा मिळावी आणि प्रशासनालाही निगडित सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून 25 लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात यावा, अशी सूचना केली आहे.

पोलिस फक्त काट्याच मारत नाहीत... 

नंबर फिरवा आणि हवे ते मागा

खासदार श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोल गडीकर यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानुसार नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य, टेस्टिंग किट, डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांच्यासाठी लागणारे सुरक्षा मास्क, कपडे, थर्मल स्कॅनर यासारखे हॉस्पिटलसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी वर्ग करण्यासाठी मान्यता कळवली आहे. दरम्यान नागरीकांनी घरी बसून काळजी घ्यावी. जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Srinivas Patil Proposed To Provide 25 lakh To District Administration