"वाशीम जिल्ह्यातील शिरपूर येथील एका जैन मंदिरात पूजेच्या अधिकारावरून मारहाण होते. दिगंबर समाज पूजा करायला गेल्यानंतर तेथे मारहाण केली जाते. या दोन पोटजातींमध्ये तोडगा काढायचा प्रयत्न सरकार करताना दिसत नाही."
सांगली : ‘‘महाराष्ट्रात भाजप सरकार जाती-जातींमध्ये भांडण लावून त्यातून सत्ता मिळवण्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढाईला या सरकारने मराठा विरुद्ध ओबीसी (OBC) लढ्याचे रूप दिले,’’ असा हल्लाबोल खासदार विशाल पाटील (MP Vishal Patil) यांनी संसदेत केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर ते बोलत होते.