
सांगली : ‘‘टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांच्या पाण्याचे आवर्तन वेळापत्रकानुसार चालवा. पाणीपट्टी वसुलीसाठी कोणत्याही शेतकऱ्यांना अडवू नका. पाण्यासाठी संघर्षाची वेळ शेतकऱ्यांवर येता कामा नये,’’ अशा स्पष्ट सूचना खासदार विशाल पाटील यांनी आज ‘पाटबंधारे’च्या आढावा बैठकीत दिल्या.