महावितरण एक लाख ग्राहकांना बसविणार प्रि-पेड मीटर 

तात्या लांडगे
बुधवार, 6 जून 2018

सोलापूर : वाढत्या थकबाकीवर उपाय म्हणून महावितरण आता राज्यभरात टप्प्याटप्याने प्रि-पेड मीटर सिस्टिम सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 1 लाख 10 हजार ग्राहकांना असे मीटर दिले जाणार आहेत. 

डिश रिचार्ज, मोबाईल रिचार्जच्या धर्तीवर महावितरणतर्फे आता वाढती थकबाकी आणि वीजगळती, विजचोरी रोखण्यासाठी नवी योजना कार्यान्वित करत आहे. त्यासाठी राज्यातील सर्व वीज ग्राहकांना प्रि-पेड मीटर दिले जाणार आहेत. सध्या त्याची निवीदा काढण्यात आली आहे. त्यामध्ये ग्राहकांकडून जेवढे पैसे भरले जातील तेवढीच वीज त्यांना मिळणार आहे.

पैसे संपल्यानंतर आपोआप वीज बंद पडेल, अशी व्यवस्था या नव्या योजनेत करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मुबलक प्रमाणात पुरेशी वीज उपलब्ध होणार आहे. सध्या मोबाईलद्वारे मीटरचे रिडिंग घेतले जात आहे. तसेच महावितरणकडून एक स्वतंत्र ऍप तयार करण्यात आले असून त्याद्वारे ग्राहक स्वत: मीटरचे रिडिंग पाठवू शकतो. लवकरच घरपोच विजबील सेवा सुरू करण्यात येणार आहे. दोन-तीन शेतकऱ्यांसाठीही स्वतंत्र डिपी देण्याची योजना लवकरच सुरू होईल, असे महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी.एस.पाटील यांनी सांगितले. 

महावितरणची सध्या 1 कोटी 15 लाख 6 हजार 448 वीज ग्राहकांकडे तब्बल 40 हजार 144 कोटींची थकबाकी आहे. आता थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्‍शन तोडण्याची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. तसेच थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर बोजा चढविण्याकरिता राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. 
- पी.एस.पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण

Web Title: mseb install pre paid meter to 1 lakh customers