महावितरणचा "लाईनस्टाफ'  सोमवारपासून तीन दिवस रजेवर 

घनशाम नवाथे
Sunday, 9 August 2020

सांगली- महावितरण कंपनीने ग्राहक स्थळ परीक्षण सर्व्हेक्षणाचे काम लादल्याचा निषेध म्हणून राज्यातील 62 हजार लाईन स्टाफ 10 ते 12 ऑगस्टअखेर तीन दिवस सामुहिक रजेवर जाणार आहे. इलेक्‍ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशनने पुकारलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास 300 लाईन स्टाफ यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे विज पुरवठा विस्कळीत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

ए.जि. असेंट सर्व्हेक्षणाच्या नावाखाली घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक वीज ग्राहकांचे स्थळ परिक्षण काम सुरू आहे. लाईनमनचे हे काम नसताना त्यांच्यावर काम लादण्यात आले आहे. मुळात हे काम कार्यालयीन तृतीय श्रेणी व त्यापुढील कामगारांमार्फत करून घेणे आवश्‍यक आहे. तरीही लाईनमनवर ते काम लादण्यात आले आहे. या कामामुळे लाईनसह त्यांच्या कुटुंबियांच्या जीव धोक्‍यात येणार आहे. कोरोनाच्या संकटात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लाईनस्टाफ भगीरथ सेवा करीत आहे. सर्व्हेक्षणच्या कामातून वगळण्यात यावे यासाठी वारंवार विनंती करून करूनही प्रशासन दाद देत नसल्यामुळे तीन दिवस सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय इलेक्‍ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशनने दिला आहे. 

सर्व्हेक्षणाचे काम लादण्याचा निषेध म्हणून लाईन स्टाफ असोसिएशनने पुकारलेल्या आंदोलनात राज्यभरातील 62 हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. सांगली जिल्ह्यातही जवळपास 300 कर्मचारी सामुहिक रजेवर जातील अशी माहिती संघटनेचे सतीश माने, केंद्रीय सचिव राजू मुल्ला, सुनिल माने, आदिनाथ पवार, कमलाकर केंगार यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL's "line staff" on three-day leave from Monday