esakal | कोरोनाच्या कहराला महापालिका सत्ताधारी जबाबदार...विरोधी पक्षनेते यांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

municipal corporation.jpg

सांगली-  महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरु आहे. खासगी कोविड 19 हॉस्पिटलमध्येही जागा मिळत नाही. तेथे पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या परिस्थितीला महापालिकेतील सत्ताधारी भाजपच जबाबदार आहे असा आरोप विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी केला आहे. सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केल्याने भाजपचा पारदर्शी कारभाराचा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारी झटकू नये. जनतेला कोरोनाबाबत वस्तुस्थिती सांगावी अशी मागणीही त्यांनी केली. 

कोरोनाच्या कहराला महापालिका सत्ताधारी जबाबदार...विरोधी पक्षनेते यांचा आरोप

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली-  महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरु आहे. खासगी कोविड 19 हॉस्पिटलमध्येही जागा मिळत नाही. तेथे पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या परिस्थितीला महापालिकेतील सत्ताधारी भाजपच जबाबदार आहे असा आरोप विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी केला आहे. सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केल्याने भाजपचा पारदर्शी कारभाराचा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारी झटकू नये. जनतेला कोरोनाबाबत वस्तुस्थिती सांगावी अशी मागणीही त्यांनी केली. 

विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले, गेल्या महिनाभरात महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. प्रशासनाने खासगी हॉस्पिटल घेतले तेथेही दाखल करुन घेतले जात नाही. पैसे मागितले जातात. पैसे मिळवून देण्याचा धंदा सत्ताधाऱ्यांनी सुरु केला आहे का? याबाबत सत्ताधारी भाजपच्या कोअर कमिटी, आमदार, खासदार, महापौर यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी. कोअर कमिटी, आमदार यांना विचारल्याशिवाय प्रशासन काहीही करत नाही. त्यामुळे प्रशासन आमचे ऐकत नाही असे सांगू नये. अन्यथा सत्तेतून पायउतार व्हा, कॉंग्रेस राष्ट्रवादी महापालिकेची सत्ता चालवायला समर्थ आहे, असेही श्री. साखळकर म्हणाले. 

ते म्हणाले, पारदर्शी कारभाराचा दावा करत सत्तेत आलेल्या भाजपने लोकांची फसवणूक केली आहे. लोकांच्या मनात संशयाचे, भितीचे वातावरण आहे. सामाजिक संस्था, कार्यकर्ते कोरोनाच्या खर्चाबाबत करत असलेल्या आरोपाला उत्तर देण्याची सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र ते मूग गिळून गप्प बसल्यामुळे महापालिका बदनाम होत आहे. 
कोरोनाच्या वाढता फैलावामुळे आता रुग्णांना उपचारासाठी ऍम्ब्युलन्समध्ये तिष्ठत बसावे लागत आहे. तर कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहांनाही वेटिंगवर थांबावे लागत आहे. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. अजून भयानक परिस्थिती येण्यापुर्वी सत्ताधाऱ्यांनी लोकांचे हाल होऊ नयेत याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. 
 
चंद्रकांतदादांनी महापालिकेवर बोलावे 

कोरोनावरुन राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर आरोप करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपची सत्ता असलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेवर बोलावे. त्यांचे दोन आमदार, खासदार, महापौर असताना महापालिका क्षेत्रात कोरोना कसा फैलावला याचे उत्तर द्यावे. त्यावर सत्ताधारी म्हणून भाजपचे लोकप्रतिनिधी काय करतात याचा जाब त्यांनी आपल्या कोअर कमिटीला विचारावा, असे उत्तम साखळकर म्हणाले.