पहारेकऱ्याचा ‘पगार कारकून’ झालाच कसा?

- डॅनियल काळे
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - महापालिकेच्या आस्थापना विभागातच कुंदन लिमकर नावाच्या पहारेकऱ्याला ‘पगार कारकून’सारखी महत्त्वाची जागा दिली कोणी? त्याला आशीर्वाद कोणाचा आहे? अशी चर्चा आज कुंदन लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडल्यानंतर महापालिका चौकात होती.

महापालिकेतील आपल्याच सहकाऱ्यांना लुटणारा हा लिमकर मोक्‍याच्या जागेपर्यंत पोचलाच कसा? त्याच्यावर कोण मेहेरबान आहे, अशा प्रकारच्या चर्चेला ऊत आला होता.

कोल्हापूर - महापालिकेच्या आस्थापना विभागातच कुंदन लिमकर नावाच्या पहारेकऱ्याला ‘पगार कारकून’सारखी महत्त्वाची जागा दिली कोणी? त्याला आशीर्वाद कोणाचा आहे? अशी चर्चा आज कुंदन लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडल्यानंतर महापालिका चौकात होती.

महापालिकेतील आपल्याच सहकाऱ्यांना लुटणारा हा लिमकर मोक्‍याच्या जागेपर्यंत पोचलाच कसा? त्याच्यावर कोण मेहेरबान आहे, अशा प्रकारच्या चर्चेला ऊत आला होता.

कुंदन लिमकर महापालिकेत पहारेकरी म्हणून कामावर लागला आहे; पण अनुभव वाढत गेल्याने त्याला आस्थापना विभागातील ही मोक्‍याची जागा दिली आहे. महापालिकेतून निवृत्त होणारे कर्मचारी म्हणजे आपले ‘बकरे’च असल्याच्या आविर्भावात आयुष्यभर या कर्मचाऱ्यांना लिमकरने लक्ष्य करून त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. 

महापालिकेत कोणत्याही विभागातला कर्मचारी असो; आरोग्य विभागातला गरीब कर्मचारी असो अथवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केबिनवर काम करणारा शिपाई असो, लिमकरने कोणालाही सोडलेले नाही. महापालिका आयुक्तांच्या केबिनवर शिपाई असणाऱ्या व सतत साहेबांच्या बरोबर फिरणाऱ्या शिपायाच्या कामातही लिमकरने दहाचा आंबा पाडला होता. त्यामुळे कर्मचारीवर्गात लिमकरबद्दल संताप होता. या संतापातूनच त्याच्यावर कारवाई झाली आहे. 

महापालिकेत वजन असणारी अनेक मंडळी लिमकरच्या साथीला असायची. त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्याने कधी लिमकरची तक्रार केली नाही. त्यामुळे त्याचे धाडस वाढतच गेले आणि तो अनेकांचे शोषण करू लागला. शिपाई पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामातही लिमकर आंबा पाडायचा. त्यामुळे त्याच्या विरोधात संताप वाढत होता. या संतापातूनच अज्ञाताने लिमकरची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. त्यातून त्याच्यावर कारवाई झाली. 

महापालिकेत खाबूगिरीचे अनेक प्रकार घडतात; पण आपल्याच सहकाऱ्यांना लुटणारा हा लिमकर महापालिका प्रशासनाला लागलेली कीड आहे. ही कीड कोठपर्यंत पसरली आहे, याचा छडादेखील या विभागाने लावायला हवा.

काही वरिष्ठ अधिकारीदेखील 
लाचलुचपत विभागाच्या रडारवर आहेत. दोन वर्षांपूर्वी नगरीच्या प्रथम नागरिकांचा स्वीय सहायकच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला होता. आता दोन वर्षांनंतर आस्थापना विभागही चर्चेत आला आहे.
 

...तर फाईल खोळंबली म्हणून समजा
महापालिकेत कोणाचा फरक काढायचा असो, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी असो, पेन्शन असो अथवा ग्रॅच्युइटी असो; येणाऱ्या रकमेत लिमकर आपला वाटा मागत होता. दहा, पंधरा, पंचवीस असे आकडे तो सहजवारी सांगत होता. त्याची मागणी पूर्ण झाली नाही की, फाईल खोळंबली म्हणून समजा. मग महिनोन्‌ महिने फाईल टेबलवरून हलतच नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal confussion in kolhapur