वसंतदादा प्रतिष्ठानतर्फे महापालिकेस अद्यावत शववाहिका प्रदान 

घनशाम नवाथे
Wednesday, 5 August 2020

सांगली-  कोविड विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर वसंतदादा सेवा प्रतिष्ठानतर्फे आणि दक्षिण भारतात असलेल्या जिल्ह्यातील गलाई बांधवांच्या मदतीने महापालिकेस शववाहिका प्रदान करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील व विशाल पाटील यांच्याहस्ते आयुक्‍त नितीन कापडणीस यांच्याकडे शववाहिकेची किल्ली प्रदान केली. 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या अद्यावत व शंभर टक्‍के निर्जंतुकीकरण शववाहिकेची पाहणी करुन वसंतदादा सेवा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या तत्कालीन अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या संकल्पनेतून आणि परिवहन विभागाच्या नियमानुसार आर.टी.ओ. विलास कांबळे यांनी शववाहिकेची निर्मिती करण्यास मंजूरी दिली आहे. 

सध्या जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामधून मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे. प्रशासनावर याचा तणाव आहे. कोरोना किंवा इतर संसर्गजन्य आजारातून रूग्णाचा मृत्यू झाल्यास खासगी रूग्णवाहिका टाळाटाळ करतात. प्रसंगी मोठ्या भाड्याची अपेक्षा करतात. त्यामुळे ही गरज लक्षात घेऊन वसंतदादा प्रतिष्ठान आणि दक्षिण भारतात असलेल्या गलाई बांधवांकडून शववाहिका देण्यात आली. शववाहिकेसाठी महापालिका आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. सुनिल आंबोळे, लायन्स नॅब हॉस्पीटलचे राजेंद्रप्रसाद जगदाळे, विजय पवार, दिनेश जाधव, संजय कुलकर्णी, भिमराव चौगुले आदी उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation on behalf of Vasantdada Pratishthan Provide updated hearse