महापालिकेस केंद्र, राज्य शासनाकडून विशेष अनुदान द्यावे : सत्ताधारी भाजपची मागणी... महापूर, कोरोनाचा महापालिकेस आर्थिक फटका 

बलराज पवार
Sunday, 30 August 2020

सांगली-  गतवर्षीचा महापूर आणि यंदाचे कोरोनाचे संकट यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे महापालिकेस राज्य शासनाकडून 25 कोटी तर केंद्र सरकारकडून 50 कोटी रुपये विशेष अनुदान मिळवून द्यावे अशी मागणी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

सांगली-  गतवर्षीचा महापूर आणि यंदाचे कोरोनाचे संकट यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे महापालिकेस राज्य शासनाकडून 25 कोटी तर केंद्र सरकारकडून 50 कोटी रुपये विशेष अनुदान मिळवून द्यावे अशी मागणी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

महापालिकेच्या वतीने कोल्हापूर रोडवर कोरोना रुग्णांसाठी सुरु केलेल्या कोविड हेल्थ सेंटरला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी भाजपचे नेते महापालिकेतील नगरसेवक शेखर इनामदार आणि महापौर गीता सुतार यांनी त्यांना निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, गेल्या वर्षीचा महापूर आणि यंदाचे कोरोनाचे संकट यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. महापालिकेचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाले आहे. सलग दोन वर्ष महापालिकेला आपत्तींचा सामना करावा लागल्याने मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कर वसुली नसल्याने नागरिकांना सोयी सुविधा देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेला राज्य शासनाकडून 25 कोटीचे अनुदान मिळवून द्यावे. तसेच कोविड हेल्थ सेंटरसाठी व्हेंटीलेर्स, डॉक्‍टर्स, स्टाफ व इतर बाबींची पुर्तता करण्यासाठी केंद्र शासनाकडून 50 कोटी रुपये असे एकूण 75 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मिळवून द्यावे अशी मागणी केली आहे. 

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर आनंदा देवमाने, उपायुक्त स्मृती पाटील, स्थायी समिती सभापती संदीप आवटी, गटनेते युवराज बावडेकर तसेच भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation should be given special grants by the Center and the state government : Demand of the ruling BJP