सांगली : ॲपेक्स चौकशीप्रकरणी महापालिकेचे घूमजाव

महासभेतील घोषणा फुकाची; कारणे सांगत जनतेची दिशाभूल
apexcare hospital
apexcare hospitalsakal

सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ८७ रुग्णांचा मृत्यू कारणीभूत ठरलेल्या ॲपेक्स हॉस्पिटलची apex hospital महापालिकेकडून चौकशीची घोषणा राणाभीमदेवी थाटात महासभेत करण्यात आले. जनमताचा रोष वाढताच महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी स्वतंत्र चौकशीची घोषणा केली. विरोधी भाजपने महापालिकेवर तिरडी मोर्चा काढत जनभावनेला वाट करून दिली. मात्र सहा महिने उलटल्यानंतर याप्रकरणी अहवालच गुंडाळला का? अशी विचारणा होऊ लागली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेली परवानगीच संशयाच्या भोवऱ्यात असताना आता विरोधकांनीही या विषयावर का मौन पाळले आहे? (Municipal Corporation inquires the death of 87 patients in the second wave of corona)

apexcare hospital
सांगली : आधी शेती वीज बीले दुरुस्त करा; मगच सवलत योजनेचा लाभ घ्या!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात मिरज रस्त्यावरील ॲपेक्स हॉस्पिटलला कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची प्रशासनाने परवानगी दिली होती; मात्र या हॉस्पिटलमध्ये पुरेशा सुविधा नव्हत्या. तसेच रुग्णांवर योग्य उपचार केले जात नव्हते. त्यामुळे या ठिकाणी उपचारास आलेल्या रुग्णांपैकी ८७ रुग्णांचा बळी गेला. याप्रकरणी महापालिकेने मे महिन्यात तक्रारी आल्यानंतर हॉस्पिटलचे डॉ. महेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच येथील हॉस्पिटलही बंद केले. पोलिस तपासात या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करताना अनेक गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले. रुग्णाच्या नातेवाईकांनी ही येथील कारभाराविरोधात तक्रारी केल्या. तसेच भाजपचे संघटक सरचिटणीस दीपक माने यांनी या प्रकरणी वारंवार आवाज उठवून प्रशासनाला या हॉस्पिटलवर कारवाई करण्यास भाग पाडले.मिरजेत याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी महासभेत तिरडी मोर्चा काढून या हॉस्पिटलमधील गैर कारभारावर आंदोलन केले आणि चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते. यानिमित्ताने म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये, याचे भान विश्‍वस्त म्हणवून घेणाऱ्या नगरसेवकांनी ठेवले पाहिजे, अशी लोकभावना आहे.(Administration allows Apex Hospital on Miraj Road to treat corona patients during the second wave of corona)

apexcare hospital
मोहोळ : कोरोना मृतांच्या वारसासाठी तीन दिवशीय मदत शिबीराचे आयोजन

गोंधळामुळे अधिवेशनात प्रश्न लांबणीवर

दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिस करतच होते, शिवाय न्यायालयानेही या प्रकरणी गंभीर दखल घेत डॉ. महेश जाधव याला वारंवार जामीनही नाकारला होता. अखेर तब्बल सात महिन्यांनी डॉ. जाधव याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयात या खळबळजनक प्रकरणावर कार्यवाही सुरू असतानाही महापालिकेचा चौकशी अहवाल काही बाहेर आला नाही. या प्रकरणाबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी तर सीबीआय चौकशीची मागणी केली. मात्र आता अधिवेशनात गोंधळ झाल्याने या प्रकरणाचे पुढे काय होणार? नेत्यांबरोबरच महापालिका नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनाही आता या प्रकरणाचा विसर पडला आहे का? हे एकूण प्रकरण गुंडाळले, अशी शंका जनतेतून उपस्थित होत आहे.

apexcare hospital
Hingoli : हिंगोलीत ख्रिसमसाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचा अपघातात मृत्यू

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. पोलिस तपास करत आहेत. अशावेळी महापालिका स्वतंत्रपणे याची चौकशी करणार नाही; मात्र पोलिस व न्यायालयाला काही माहितीची, सहकार्याची गरज असल्यास ती नक्की देऊ.

- दिग्विजय सूर्यवंशी, महापौर

‘अपेक्स’मधील ८७ कोरोना बळीप्रकरणी आम्ही महासभेत तिरडी मोर्चा काढून चौकशीची मागणी केली होती; मात्र महापौरांनी आश्वासन देऊनही चौकशी केलेली नाही. न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू असली तरी या हॉस्पिटलला देण्यात आलेल्या परवान्याबाबत महापालिकेनेही स्वतंत्र चौकशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्हीही चौकशी होण्यासाठी पाठपुरावा करू.

- धीरज सूर्यवंशी, भाजप नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com