महापालिकेचा पर्यावरण अहवाल दोन महिन्यात तयार होणार 

घनशाम नवाथे 
Saturday, 20 February 2021

महापालिका क्षेत्राचा पर्यावरण अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. भिवंडीच्या स्कायलॅब ऍनालॅटिकल लॅबोरॅटरी संस्थेला हे काम देण्यात आले आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच असा पर्यावरण अहवाल तयार केला जाणार आहे. दोन महिन्यात हा अहवाल सादर केला जाणार आहे. 

सांगली : महापालिका क्षेत्राचा पर्यावरण अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. भिवंडीच्या स्कायलॅब ऍनालॅटिकल लॅबोरॅटरी संस्थेला हे काम देण्यात आले आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच असा पर्यावरण अहवाल तयार केला जाणार आहे. दोन महिन्यात हा अहवाल सादर केला जाणार आहे. 

महापालिकेच्या स्थापनेला दोन दशके उलटली, तरी त्याचा पर्यावरण अहवाल केला नव्हता. आयुक्त नितीन कापडणीस यांनी असा अहवाल तयार करण्याचा निर्णय घेत यासाठी स्कायलॅब ऍनालॅटिकल लॅबोरॅटरी संस्थेची नियुक्ती केली. ही संस्था महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाची माहिती आणि अभ्यास करुन पर्यावरण अहवाल तयार करणार आहे. दोन महिन्यात हा अहवाल महापालिकेला सादर केला जाणार आहे. 

यात शांतता क्षेत्र, उत्सव जल पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, जल शुद्धीकरण केंद्रे, मलनि:स्सारण, वायू पर्यावरण, शहर सौंदर्यीकरण याचा अभ्यास करून निकष ठरवले जाणार आहेत. 
महापालिका क्षेत्राचा पहिल्यांदाच पर्यावरण अहवाल तयार होत आहे. नियुक्त संस्थेचे चार प्रतिनिधी त्याचा अभ्यास करणार आहेत. या सर्व निकषांवर दोन महिन्यात ते महापालिकेचा पर्यावरण अहवाल तयार करतील. पर्यावरणात होणाऱ्या बदलाची माहिती होण्यासाठी एक मशीनही आरोग्य मुख्यालय येथे लावले आहे. 

आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, पर्यावरण अभियंता ऋषीकेश किल्लेदार, युनूस बारगीर, अमोल माने आदी प्रयत्नशील आहेत.

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Environment Report will be ready in two months