सांगली : इस्लामपूर येथील वृद्धेच्या खून प्रकरणातील संशयिताने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. त्याला अवघ्या तासात इस्लामपूरच्या पथकाने पुन्हा जेरबंद केले. मात्र, यातील निष्काळजीपणा करणाऱ्या चौघा अंमलदारांची खातेनिहाय चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.