
कुपवाड : ‘मोका’तील आरोपी व सराईत गुन्हेगार समीर रमजान नदाफ (वय ४१, रॉयल सिटी अपार्टमेंट, कुपवाड) याचा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यासमोर सोमवारी (ता. १४) रात्री साडेदहाच्या सुमारास धारदार शस्त्राने अनोळखींनी खून केला. सांगली एलसीबी, कुपवाड पोलिसांनी कारवाई केली. दोन संशयितांना अटक केली आहे. सोहेल सलीम काझी (वय ३०, खारे मळा चौक, कुपवाड) व सोहेल ऊर्फ साबीर शरीफ मुकादम (वय २६, बडेपीर कॉलनी, जुना मिरज रस्ता, कुपवाड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.