बालकाच्या मारेकऱ्यास फाशी द्या; कुडची येथे नागरिकांचा मोर्चा

आरोपीस फाशीची शिक्षा करण्याच्या मागणीसाठी शनिवारी सर्व ग्रामस्थांनी सामूहिक मोर्चा काढला. त्याबाबतचे निवेदन उपतहसालदार कार्यालयास देण्यात आले.
Protest
ProtestSakal
Updated on: 

रायबाग : तालुक्यातील कुडची येथील महमदसाद शबीरद्दीन देसाई (वय ५) या बालकाचा त्याच्या चुलत भावाने खून (Murder) केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपीस (Criminal) फाशीची शिक्षा करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (ता. १८) सर्व ग्रामस्थांनी सामूहिक मोर्चा काढला. त्याबाबतचे निवेदन उपतहसालदार कार्यालयास देण्यात आले.

महमदसाद देसाई हा सोमवारी (ता. १३) हा बेपत्ता झाला होता. त्याची शोधाशोध करूनही सापडला नव्हता. मंगळवारी (ता. १४) त्याचा मृतदेह रेल्वे स्थानक परिसरात आढळून आला. या प्रकरणी संशयावरून महमदसादच्या चुलत भावास पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता घरगुती कारणातून आपण मारून टाकल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी निषेध करून बालकास न्याय मिळावा आणि आरोपीस फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी शनिवारी (ता. १८) हा मोर्चा काढण्यात आला. त्यात गावातील मान्यवर, युवक मंडळे, महिला व मुलांचा समावेश होता. यावेळी त्यांनी निषेध व विविध मागण्यांचे फलक हातात धरले होते. प्रत्येक जण बालकाला त्वरित न्याय देण्याची मागणी करीत होता.

Protest
पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल २१ ते २३ डिसेंबर दरम्यान

महमदसाद याच्या आई व वडिलांनी आपला संताप व्यक्त केला. सहा मुली व महमदसाद हा एकुलता असल्याने असल्याने त्यांनी आक्रोश करून न्याय देण्याची मागणी केली. यावेळी उपतहसील दानिहाळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

रेल्वे पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. कुडची पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमदार पी. राजीव यांनी आरोपीस कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam additional water demand for Sangli
Sangli District Bank Election Strategy
Woman Allegedly Extorted of ₹17 Lakh
Gopichand Padalkar sangli jilha bank
Marathi News Esakal
www.esakal.com