कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंतबुवा पिसाळ यांचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

येथील कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंतबुवा पिसाळ (वय 34) यांचा आज (मंगळवारी) दुपारी खून करण्यात आला. ही घटना येथील झेंडे गल्लीतील मारुतीबुवा कराडकर मठामध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

पंढरपूर : येथील कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंतबुवा पिसाळ (वय 34) यांचा आज (मंगळवारी) दुपारी खून करण्यात आला. ही घटना येथील झेंडे गल्लीतील मारुतीबुवा कराडकर मठामध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. मठाधिपती होण्याच्या वादातून बाजीराव जगताप (वय 35) यांनी जयवंतबुवा पिसाळ यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की येथील अनिलनगर परिसरात मारुतीबुवा कराडकर यांचा मठ आहे. कराड भागातील रहिवासी जयवंतबुवा पिसाळ आणि बाजीराव जगताप यांच्यामध्ये मठाधिपती होण्यावरून वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर भांडणामध्ये झाले. आणि यातूनच बाजीरावबुवा कराडकर यांनी जयवंतबुवा पिसाळ यांचा चाकूने वार करून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

जयवंतबुवा पिसाळ हे कराडकर मठाचे विद्यमान मठाधिपती आहेत, तर बाजीरावबुवा जगताप हे माजी मठाधिपती होते. हा मठ बंडातात्या कराडकर यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murder of Jayavantbuwa Pisal