सांगलीवाडीतील तो खून अनैतिक संबंधातील वादातून 

crime.jpg
crime.jpg
Updated on

सांगली- सांगलीवाडीतील येथील मृत बांधकाम कामगार शिवाप्पा केळगडे (वय 42, मुळ रा. विजापूर) याचा खून अनैतिक संबंधाच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाप्पा याला संशयित आरोपी शिवाजी नामदेव शिंगे (वय 40, मूळ रा. सातलगी, जि. विजापूर) याचे अनैतिक संबंध माहित झाले होते. त्यामुळे तो त्याला वारंवार शिवीगाळ करत होता. त्यातूनच शिवाजी आणि साथीदार हणमंत सिद्धाप्पा पुजारी (वय 35, मूळ रा.ककमरी, जि. बेळगाव) यांनी त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. 


कृष्णा नदीत शुक्रवारी (ता.1) पोत्यात घातलेला मृतदेह तरंगत असल्याचे पोलिसांना आढळले होते. पोलिसांनी जीवरक्षक टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर अवघ्या काही तासाच मृताची ओळख पटवली. मृतदेह बेपत्ता शिवाप्पा याचा असल्याची माहिती मिळाली. तो 28 एप्रिलपासून बेपत्ता असल्याचे समजले. चौकशी केल्यानंतर वादातून शिवाजी व हणमंत या दोघांनी विळ्याने गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली दिली. 


पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर खुनाला अनैतिक संबंधाच्या वादाची किनार असल्याचे स्पष्ट झाले. शिवाजी याचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे शिवाप्पा हा वारंवार त्याला शिवीगाळ करत होता. त्यामुळे शिवाजीने त्याचा काटा काढायचे ठरवले. हणमंत याला घेऊन त्याचा खून करून मृतदेह पोत्यातून नदीत टाकला. दोघांनी खुनात वापरलेला विळा पोलिसांना काढून दिला. तो जप्त करण्यात आला. दोघांची पोलिस कोठडी सोमवारी (ता.4) संपणार असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com