वाघमोडेनगरमध्ये पत्नीवर खूनी हल्ला; गंभीर जखमी; पतीस अटक 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

पती रामचंद्र विठोबा हाक्के (वय 35, मूळ रा. शिंगणापूर, ता. जत, सध्या रा. वाघमोडेनगर) असे याच्याविरोधात कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

 

सांगली  ः कुपवाड येथील वाघमोडेनगर परिसरात घरगुती कारणातून पत्नीवर खूनी हल्ला करण्यात आला. अर्चना रामचंद्र हाक्के असे त्यात जखमी महिलेचे नाव असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पती रामचंद्र विठोबा हाक्के (वय 35, मूळ रा. शिंगणापूर, ता. जत, सध्या रा. वाघमोडेनगर) असे याच्याविरोधात कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. आज पहाटे ही घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे, की रामचंद्र हाक्के हा मूळचा जत तालुक्‍यातील आहे. कामानिमित्त तो गेल्या काही दिवसांपासून वाघमोडेनगर येथे राहण्यास होते. रामचंद्र हा पत्नी अर्चना यांच्यावर वारंवार संशय घेवून वाद घालत होता. कालही त्याने वाद घातला. वाट टोकाला गेल्यानंतर दगड टॉवेलमध्ये गुंडाळून मारहाण करण्यास सुरूवात केली. अर्चना यांच्या डोक्‍यात जबरी मारहाण झाल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, अर्चना यांचा मावस भाऊ दशरथ यशवंत गडदे यांनी कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती रामचंद्र याच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक निरज उबाळे अधिक तपास करत आहे. 

संपादन ः शैलेश पेटकर  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murderous attack on wife in Waghmodenagar; Serious injuries