'हिंदूंची घरं पेटवली जाताहेत, ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा'; माजी आमदारानं वेधलं लक्ष
Murshidabad Violence Former MLA Nitin Shinde : "मुर्शिदाबाद जिल्ह्यातील ६५० कुटुंबांना घर सोडून जायची वेळ आली आहे. केंद्र सरकारने यावर हस्तक्षेप करून ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी."
सांगली : हिंदू एकता आंदोलनतर्फे बाळासाहेब ठाकरे चौकात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंदूंवर (Hindu Community) झालेल्या हिंसाचाराविरोधात संतप्त निदर्शने करण्यात आली.