मासे खाताय सावधान, मंत्री मुश्रीफ का म्हणताहेत हा मासा नका खाऊ

विनायक लांडे
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

नगर : ""मच्छीप्रेमींसाठी एक दुःखद बातमी आहे. तुम्ही खबरदारी न घेतल्यास तुम्हाला भयंकर आजाराला सामोरे जावं लागेल. प्रत्येक मच्छीखवय्यांची वेगवेगळी च्वॉईस असते. तुम्ही जर मांगूरप्रेमी असाल तर खबरदार... आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफच तसं म्हणताहेत. मग त्यात नक्की काय काही तथ्य असणार? 

नगर : ""मच्छीप्रेमींसाठी एक दुःखद बातमी आहे. तुम्ही खबरदारी न घेतल्यास तुम्हाला भयंकर आजाराला सामोरे जावं लागेल. प्रत्येक मच्छीखवय्यांची वेगवेगळी च्वॉईस असते. तुम्ही जर मांगूरप्रेमी असाल तर खबरदार... आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफच तसं म्हणताहेत. मग त्यात नक्की काय काही तथ्य असणार? 

जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांची तड लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, खासदार सदाशिव लोखंडे, डॉ. सुजय विखे पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, आशुतोष काळे व लहू कानडे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आदी उपस्थित होते. 

प्रशासन करणार जागृती

मांगूर मासे (मिशावाला मासा, काही भागात याला डोकडा म्हणतात.) खाल्ल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावं लागतं, हे समोर आलं आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीतर्फे हे मासे नागरिकांनी खाऊ नयेत, यासाठी प्रचार आणि प्रसार करण्याच्या सूचनाही मुश्रीफ यांनी संबंधित विभागाला दिल्या. 

बिबट्याला पायबंद घालणार
पालकमंत्री म्हणाले ""बिबट्यांचे लोकवस्तीत येणे यावर प्रतिबंधासाठी उपाययोजना वन विभागाने कराव्यात. त्यासाठी अधिक पिंजरे घेण्यात यावेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शंभर कोटी अधिकचा निधीतून शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व संरक्षण, नवे विश्रामगृह, शाळाखोल्यांचे बांधकाम, रस्ते विकास आदींसाठी उपयोगात आणत आहोत. शाळाखोल्यांची दुरुस्ती व बांधकाम जिल्हा नियोजनचा निधी, आमदार व खासदार निधी आणि साईबाबा विश्वस्त संस्थानने दिलेला निधी यातून उत्तम प्रकारे करण्यात येणार आहे.'' 

अवैध वाळू वाहतूक मोडून काढा 
जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला पायबंद घालून ती मोडून काढा आणि अवैध गुटखाप्रकरणी कडक कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांना दिले. 

वृक्षलागवडीवर फोकस 
जिल्हा अधिकाधिक स्वच्छ, सुंदर व्हावा, यासाठी वृक्षलागवडीवर फोकस करण्याची गरज आहे. वृक्षलागवडीबरोबरच वृक्षाचे संगोपन, संवर्धन करण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Musharraf says don't eat this fish