Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू
Solapur Pune Highway : सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळजवळ एका अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने पोलिसांनी तपास सुरू केला असून, नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोहोळ : सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील एका हॉटेल समोर महामार्गाच्या दोन्ही रस्त्याच्या दुभाजकात एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह सापडला असून, मोहोळ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत त्याची अकस्मात मयत अशी नोंद केली आहे.