esakal | नगरला मिळाले डॅशिंग एसपी, अखिलेशकुमार सिंह आज घेणार चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar got Dashing SP, Akhilesh Kumar Singh to take charge today

पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नगर जिल्ह्याला नवीन पोलिस अधीक्षक मिळाले आहेत. त्यांनी अकोले येथे प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर यवतमाळ, बीड, धुळे येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. आज सायंकाळी ते नगरमध्ये येऊन पदभार स्वीकारणार आहेत, त्यांनी स्वतःच सकाळला ही माहिती दिली. 

नगरला मिळाले डॅशिंग एसपी, अखिलेशकुमार सिंह आज घेणार चार्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक म्हणून अखिलेशकुमार सिंह आज सायंकाळी पदभार स्वीकारणार आहेत. प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडून ते पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे घेतील.

नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पद गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त होते. त्यामुळे अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे प्रभारी पदभार होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक इशू सिंधू उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. इशू सिंधू यांनी वाळूचोरांवर चांगला वचक बसविला होता. ते उच्च शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार यांची गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती.

आपल्या मर्जीतला अधिकारी पोलिस अधीक्षक असावा, यासाठी अनेक राजकारण्यांनी कंबर कसली होती. अखेर पाच महिन्यांनतर मुंबई शहर येथील परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त अखिलेशकुमार यांची जिल्हा पोलिस अधीक्षकपदी बदली झाली. त्यांचा पदभार सहाय्यक पोलिस महानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे यांच्याकडे सोपाविण्यात आला आहे, तसा आदेश उपसचिव कैलास गायकवाड यांनी काल आदेश काढला.

पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नगर जिल्ह्याला नवीन पोलिस अधीक्षक मिळाले आहेत. त्यांनी अकोले येथे प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर यवतमाळ, बीड, धुळे येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. आज सायंकाळी ते नगरमध्ये येऊन पदभार स्वीकारणार आहेत, त्यांनी स्वतःच सकाळला ही माहिती दिली. 

दरम्यान, पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाळू तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. कमी मनुष्यबळामध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि नवीन पोलिस ठाणे मंजूर करून आणणे, असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर उभे आहेत. सध्या कोरोनामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखावी लागणार आहे. या कामापासून त्यांना श्रीगणेशा करावा लागेल.

इन कॅमेरा कारवाई 
पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार बीड जिल्ह्यातील केज येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अवैध धंद्यावर इन कॅमेरा कारवाई सुरू केली होती. त्यांची इनकॅमेरा कारवाई चांगलीच गाजली होती. त्यांच्या कारवाईमुळे केजमधील दारूभट्टी व अनैतिक व्यवसाय कायम स्वरूपी बंद झाला. त्यांनी वेगळा प्रोजेक्‍ट तयार करून त्या पीडितांना महिलांना कायम स्वरूपीचा रोजगार मिळवून दिला. डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हेही खमकी भूमिका घेतात. त्यांच्या जोडीला पोलीस अधीक्षकही तसेच आल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.
 

loading image