शिराळ्यात आज नागपंचमी, पण पारंपरिक नागपूजा 

शिवाजी चौगुले 
Saturday, 25 July 2020

नागपंचमी सणाच्या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मंदिरात फक्त पारंपरिक पद्धतीने पुजन व मानाच्या पालखीचे आगमन होईल.

शिराळा : नागपंचमी सणाच्या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मंदिरात फक्त पारंपरिक पद्धतीने पुजन व मानाच्या पालखीचे आगमन होईल. मंदिरात दर्शनाला व पालखी दर्शनासाठी परवानगी नाही. त्यामुळे लोकांनी घरातच नागप्रतिमेची पूजा करावी असे प्रतिपादन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले. 

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर अंबामाता मंदिरात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले,मंदिरामध्ये सकाळी विधीवत पुजा होईल. दुपारी महाजन कुटुंबातील दहा लोकांच्या उपस्थितीत मानाच्या पालखीचे आगमन होईल. मात्र पालखीच्या दर्शनाला इतर कोणालाही परवानगी नाही. शहरात कडक बंदोबस्त राहणार आहे. 

नगराध्यक्षा सौ. अर्चना शेटे म्हणाल्या, शहरातील नागरिकांचे कडून योग्य सहकार्य होत आहे. प्रशासनाला सहकार्य करत समन्वयातून यावेळची नागपंचमी शांततेत साजरी होईल. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडून आलेल्या सूचना शहरातील नागरिक पाळतील. आम्ही ही स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून काळजी घेऊन सहकार्य करू. 

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगराध्यक्षा अर्चना शेटे, उपनगराध्यक्ष किर्तिकुमार पाटील, बांधकाम सभापती सुनिता निकम, नगरसेवक बंडा डांगे, संजय हिरवडेकर, वैभव गायकवाड,विजय दळवी, विश्वप्रतापसिंह नाईक, सुनंदा सोनटक्के, केदार नलवडे, नेहा सुर्यवंशी, सीमा कदम,प्रतिभा पवार, संभाजी गायकवाड, संतोष हिरुगडे, उपस्थित होते. 

शिराळ्यातील मंदिरात दर्शनाला पालखी दर्शनासाठी परवानगी नाही. त्यामुळे लोकांनी घरातच नागप्रतिमेची पूजा करावी. शहरात कडक बंदोबस्त राहणार आहे. 
- गणेश शिंदे, तहसीलदार 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpanchami today in Shirala, but traditional Nagpuja