तासगाव अर्बन बँकेत चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर तिघे मार्केट यार्डातून पसार झाले. त्यानंतर तिघांनी मल्टिप्लेक्स टॉकीजच्यामागील कॉलनीमधील बंद घर फोडून चांदीचे साहित्याची चोरी केली.
सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील (Vasantdada Market Yard) तासगाव अर्बन बँकेच्या (Tasgaon Urban Bank) शाखेत काल मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर एलसीबीच्या (LCB) पथकाने २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत तिघा सराईतांची नावे निष्पन्न केली. त्यापैकी एका चोरट्यास थरारक पाठलाग करत अटक करण्यात आली. कऱ्हाडच्या संशयितासह दोघे पसार असून त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.