
सांगली : शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या प्रश्नांवर चर्चेची मागणी केली होती. परंतू ते सचिन वाझेला वाचवत बसले आणि अंबानींना मदत करायची व्यवस्था केली. चर्चा झाली असती तर भाजपने शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत केलेले चमत्कार पहायला मिळाले असते. वीज बिलाबाबत शेतकऱ्यांना लुटू द्यायचे नाही, ही कॉंग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. मग काय व्हायचे ते परिणाम बघू. शेतकऱ्यांच्या पंपाची वीज कोणत्याही परिस्थितीत तोडू देणार नाही, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज दिला.
शेतकऱ्यांच्या वीजेच्या बिलाबाबत पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांना वाढीव व ऍव्हरेज बिले पाठवली आहेत. त्यामुळे काही झाले तरी त्यांचे कनेक्शन तोडू न देण्याची भूमिका सोमवारच्या बैठकीत घेतली जाईल. पुढे ते म्हणाले 'महाराष्ट्राला बदनाम करण्याचे भाजपचे धोरण आहे. सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू हे महत्वाचे उदाहरण म्हणावे लागले. बिहारच्या निवडणुकीत या मुद्दयाचा वापर केला. सध्या पोलिस अधिकारी सचिन वाझेला यांना खलनायक करण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे. नार्को टेस्टवरून खोटी बोंब आणि डबल ढोलकी वाजवण्याची भाजपची पद्धत सर्वांना माहित आहे. महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपला येथील जनता कधीच माफ करणार नाही.'
ते पुढे म्हणाले, 'अंबानींच्या घरावर हेलिपॅड, घरातील व्यक्तींना झेडप्लस आणि शेतकरी आंदोलनात टीका होत असलेल्या अंबानी, अदानी यांना सहानुभूती मिळावी यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत. अंबानीच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर स्फोटके मिळाली. परंतु घराजवळ स्फोटके मिळाल्याची कांगावा
करत या मुद्यावरून विधानसभेचा दुरूपयोग केला.''
सीमाप्रश्नांवर भाजप गप्प
पटोले म्हणाले, 'भाजपला केंद्रात सत्ता नसली की सीमा प्रश्न आठवतो. सत्तेत आल्यानंतर मात्र ते प्रश्न विसरून जातात. कर्नाटकात आता भाजपची सत्ता आहे. तेथे मराठी माणसावर अन्याय होत असताना भाजप बोलायला तयार नाही. प्रत्येक गोष्टीत भाजपची संशयास्पदच भूमिका असते.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.