Accused Theft Arrested : कुंडलमधील चोरीचे आरोपी नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात
Sangli News : चोरीतील ठाकूर मंडलोई व प्रिन्स हे अन्य दोघे अद्याप पसार आहेत. यातील तिघे व अन्य दोघे अशा पाच जणांनी कुंडल शहरात ता. २७ डिसेंबर २००४ ला रात्री धाडसी चोरी करून दहशत निर्माण केली होती.
"Nandurbar police arrest suspects involved in the Kundal theft case and recover stolen goods."Sakal
कुंडल : शहरात झालेल्या धाडसी व जबरी चोरीतील संशयित चोरट्यांना नंदुरबार पोलिसांना पकडण्यात यश मिळाले. नंदुरबार शहर पोलिस व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा यांनी या संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले. कुंडल शहरात त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले आहे.