जगाच्या रंगभूमीवर थैमान घालणाऱ्या कोरोनाला नटराज पायाखाली घेतील

Nataraja will take Corona under his feet
Nataraja will take Corona under his feet
Updated on

सांगली : जीवनमूल्ये जतन करण्यासाठी सांस्कृतिक चळवळीची समाजाला गरज असते. मात्र, कोरोनामुळे ही चळवळ थंडावल्याने कलाकार अस्वस्थ आहेत. जगाच्या रंगभूमीवर थैमान घालणाऱ्या कोरोनाला नटराज नक्की पायाखाली घेतील, असा विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी विजय कडणे यांनी व्यक्त केला. येथील नाट्य, चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ, कल्याण ट्रस्टतर्फे आयोजित रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम झाला. डिसेंबरमध्ये पुरस्कार वितरण होणार आहे. 

दैवज्ञ भवनमध्ये प्रारंभी दीपप्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आले. राजेंद्र पोळ यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या धन्वंतरी पुरस्काराचे आणि जीवनरक्षक पुरस्काराचे वितरण डिसेंबरमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष विजय कडणे यांनी दिली. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे (सांगली) नाट्य व चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट (सांगली) या संस्थेस उत्कृष्ट संस्था म्हणून नुकतेच सन्मानित करण्यात आल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास बाबासाहेब साळुंखे, रमेश पाटील, जावेद मुजावर, किशोर चव्हाण, ऋषीकेश तुराई, अभिलाष कदम, सुनील नाटेकर, रविकिरण जाधव, अभिषेक वेर्णेकर, चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी व नाट्यप्रेमी उपस्थित होते. 

दरम्यान, महापालिकेतर्फे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात उपायुक्‍त राहुल रोकडे यांच्या हस्ते नटराज पूजन झाले. या वेळी मालमत्ता व्यवस्थापक पराग कोडगुले, धनंजय हर्षद यांच्यासह मालमत्ता विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli DCC Bank recruitment latest update
Maharashtra pomegranate price latest update
Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Marathi News Esakal
www.esakal.com