पन्हाळगडाच्या पायथ्याशी रंगणार राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा...

National wrestling computation arranged at panhala kolhapur
National wrestling computation arranged at panhala kolhapur
Updated on

पन्हाळा (कोल्हापूर) - ऐतिहासिक पन्हाळगडाखालील संजीवन विद्या संकुलात २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर असे तीन दिवस मुला-मुलींच्या राष्ट्रीय शालेय कुस्त्या रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी देशभरातील ३० राज्यांतील १९ वर्षांखालील ७०० कुस्तीगीर सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी ‘संजीवन’ मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

असा रंगणार कुस्तीचा फड

राज्याच्या क्रीडा व युवक  सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी (कोल्हापूर) यांच्या विद्यमाने या स्पर्धा १० गटात नॉक आऊट पद्धतीने होणार आहेत. यासाठी १९ वर्षाखालील मुलांचे ५७ ते १२५ किलो आणि मुलींचे ५० ते ७८ किलो वजन गट करण्यात येणार आहेत. प्रत्येक वयोगटातील विजेत्या पहिल्या चार कुस्तीगीरांना प्रशस्तीपत्र आणि मेडल देण्यात येणार असून राज्य कुस्तीगीर परिषदेच्या २५ पंचांच्या मार्गदर्शनाखाली हा कुस्तीचा फड रंगणार आहे. यातून निवड होणाऱ्या पैलवानांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

मुला-मुलींच्या राष्ट्रीय शालेय कुस्त्या रंगणार

स्पर्धेचे उद्‌घाटन शनिवारी (ता. २८) सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संजीवनचे अध्यक्ष पी. आर. भोसले, नगराध्यक्षा सौ. रुपाली धडेल, महापालिका आयुक्‍त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांच्या हस्ते होणार आहे. दररोज त्याच दिवशी सायंकाळी विजेत्या मल्लांचा बक्षीस समारंभ होणार आहे. पत्रकार परिषदेला पी. आर. भोसले, प्राचार्य एन. आर. भोसले, जिल्हा क्रीडा अधिकारी बालाजी बडबडे, रोहिणी मोकाशी, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com