तब्बल 50 वर्षांनी नवेखेडला प्राथमिक आरोग्य केंद्र

शामराव गावडे
Saturday, 9 January 2021

नवेखेड : येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे. 50 वर्षा पूर्वी ग्रामस्थांनी पाहिलेले स्वप्न यामुळे साकारणार आहे "सकाळ'ने याबाबत पाठपुरावा करून मोलाची भूमिका बजावली आहे. 

नवेखेड : येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे. 50 वर्षा पूर्वी ग्रामस्थांनी पाहिलेले स्वप्न यामुळे साकारणार आहे "सकाळ'ने याबाबत पाठपुरावा करून मोलाची भूमिका बजावली आहे. 

वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कुठे जाणार ? अशी चर्चा होती. नवेखेड, जुनेखेड, मसुचिवाडी या गावांच्या सोयीच्या दृष्टिने ते नवेखेड येथे होणे गरजेचे होते. सरपंच प्रदीप चव्हाण यांनी वेळोवेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी लावून धरली. जिल्हा परिषद सदस्या प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनीही जिल्हा परिषद मासिक सभेमध्ये तसा ठराव करून याला गती दिली. गावच्या सुरवातीलाच असणारी उपकेंद्रच्या इमारत यासाठी सुरवातीच्या टप्प्यात वापरण्यात येणार आहे. भविष्यातील बांधकाम करण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध आहे. 

पूर्वी साधारण 50 वर्षांपूर्वी याठिकाणी बावची येथे कार्यरत असणारे आरोग्य केंद्र मंजूर होते. परंतु त्याकाळी लोकांची सरकारी दवाखान्याबद्दल असणारी उदासीनतेमुळे ते केंद्र सुरू होऊ शकले नाही. नंतर ते बावचीयेथे सुरू झाले. यानिमित्ताने 50 वर्षानंतर ही सुविधा गावाला मिळत आहे. "सकाळ'ने याबाबत वेळोवेळी आवाज उठवून लोकभावना प्रशासनासमोर ठेवली त्याला या मंजुरीने यश आले. 

नवेखेड येथे होणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आदर्शवत पणे चालवले जाईल. या परिसरातील लोकांची मोठी सोय या निमिताने होईल. 
- प्रदीप चव्हाण, सरपंच, नवेखेड.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navekhedla Primary Health Center after 50 years