esakal | कॉंग्रेस विरुद्ध भाजप ; सांगलीत पुन्हा रंगणार सामना

बोलून बातमी शोधा

NCP and BJP oppose election in sangli political changes possibilities}

कॉंग्रेसचे माजी महापौर हारुन शिकलगार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे.

कॉंग्रेस विरुद्ध भाजप ; सांगलीत पुन्हा रंगणार सामना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : महापालिकेची सत्ता गेल्यानंतर भाजप विरुध्द कॉंग्रेस आघाडी असा दुरंगी सामना पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 16 अ च्या पोटनिवडणुकीत होणार आहे. कॉंग्रेसचे माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. 

कै. शिकलगार यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देऊनही निवडणूक बिनविरोध करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न होता. मात्र महापालिकेतील सत्ता गेल्याचे उट्‌टे काढण्यासाठी ही निवडणूक ताकदीने लढवण्याचे भाजपने ठरवले आहे. यासाठी सक्षम उमेदवार शोधण्याचे काम सुरु आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप मतदार यांनी प्रसिध्द केली होती. त्यावर 23 फेब्रुवारीपर्यंत हरकत घेण्याची मुदत होती. मात्र एकही हरकत दाखल झाली नाही. त्यामुळे तीन मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. 

हेही वाचा - सांगली जिल्ह्यातील 72 संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा स्थगिती
 

राज्यातील काही महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकीसोबतच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. यात सांगलीतील प्रभाग क्रमांक 16 अ चा समावेश आहे. प्रारंभी भाजपमधील एका गटानेही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र महापालिकेत भाजपचे सात नगरसेवक फोडून त्यांच्या सत्तेला सुरुंग लावून कॉंग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत आली. बहुमताने सत्ता मिळवूनही अवघ्या अडीच वर्षात सत्ता गमवावी लागल्याचे मोठे शल्य भाजपला आहे. त्यामुळे दुखावलेल्या भाजपने पोट निवडणूक लढवून कॉंग्रेसला पराभूत करून उट्टे काढण्याची तयारी चालवली आहे. 

या प्रभागातून चार पैकी दोन कॉंग्रेस तर दोन भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे येथे दोघांची ताकद समान आहे. आघाडीने आमची सत्ता गैरमार्गाने काढून घेतली. जनतेने आम्हाला कौल दिलेला असताना घोडेबाजार करून आमचे काही नगरसेवक विकत घेतले आणि जनमताचा अनादर केला. जनमताचा कौल यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होईल. भाजप इथे सक्षम उमेदवार देणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे यांनी सांगितले. 

हेही वाचा -  गावकारभाऱ्यांना मानधन मिळते तरी किती?

संपादन - स्नेहल कदम