esakal | 'कोण आला रे कोण आला, मोदी-शहांचा बाप आला'; साताऱ्यात शक्तीप्रदर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

भाजपने सुरू केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जशास तसे उत्तर देण्यासाठी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साताऱ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. युवकांच्या मोटारसायकल रॅलीसह पदयात्रा काढण्यात आली होती.

'कोण आला रे कोण आला, मोदी-शहांचा बाप आला'; साताऱ्यात शक्तीप्रदर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात आज (रविवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागतार्थ कोण आला रे कोण आला, मोदी-शहाचा बाप आला अशा घोषणा देण्यात आल्या.

भाजपने सुरू केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जशास तसे उत्तर देण्यासाठी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साताऱ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. युवकांच्या मोटारसायकल रॅलीसह पदयात्रा काढण्यात आली होती. जिल्हा परिषद मार्गे रॅली बॉम्बे चौकातून कल्याण रिसॉर्टला गेली, तेथे जाहीर सभा होणार आहे. 

भाजपचे मागील वेळेचे सातारा विधानसभा मतदार संघातील उमेदवार आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे विरोधक दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये माजी खासदार उदयनराजे भोसले आणि माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पक्षातून फोडण्यात यश मिळविले. या दोन नेत्यांच्या जोरावर जिल्ह्यात भाजपचे आमदार निवडून आणण्याची रणनीती भाजपने आखली आहे. ही रणनीती फेल ठरविण्यासाठी व खासदार, आमदारांच्या पक्ष सोडून जाण्याने अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी शरद पवार यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

loading image
go to top