गोपीचंद पडळकरांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने फिरवले गाडीवरुन अन पुढे घडलं असं...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

गोपीचंद पडळकर हे जत दौर्‍यावर होते यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमू एडके त्यांच्यासोबत दुचाकीवरुन जत शहरातून फेरफटका मारला होता.

जत (सांगली) - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे शनिवारी जत दौऱ्यावर आले असता यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके यांनी त्यांच्यासमवेत दुचाकीवरुन फेरफटका मारला होतो.पडळकर यांनी राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती  तरी देखील एडके यांनी पक्षाच्या धोरणाविरोधी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी सहा वर्षा करीता त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली.ही घोषणा आहे इस्लामपूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत करण्यात आली आहे.

एडके यांच्याकडे पक्षाने मागितला होता खुलासा

शनिवारी भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर हे जत दौर्‍यावर होते यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमू एडके त्यांच्यासोबत दुचाकीवरुन जत शहरातून फेरफटका मारला होता. याबाबतची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती यानुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी याबाबतचा अहवाल तालुकाध्यक्ष यांच्याकडे मागितला होता. त्यांनी आज अहवाल जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दिला आहे. या संदर्भात नगरसेवक एडके यांच्याकडे पक्षाने खुलासा मागितला होता.अद्याप खुलासा न दिल्याने व पक्षाविरुद्ध पक्षाच्या धोरणाविरोधात ही भूमिका घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

वाचा - केंद्राच्या निधीच्या व्याजावर राज्याचा डोळा... पण सरपंच म्हणतात देणार नाही...

जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक टिमु एडके जत शहरातून दुचाकीवरून जाहीरपणे व जाणीवपूर्वक फिरले होते. वस्तुस्थिती पाहता आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या दर्जाची टीका केली होते राज्यभर या टीकेचा निषेध होत असताना जतमध्ये मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक एडके आमदार पडळकर सोबत जाहीरपणे फिरत असताना दिसले होते. याबाबतचा अहवाल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडून मागवण्यात आला होता. एडके यांच्याकडून खुलासा मागितला होता त्यांनी दिला नाही पक्ष विरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp corporator laxman edake suspend from party for tour on bike with gopichand padalkar