राष्ट्रवादीतर्फे येथे मोफत"आर्सेनिक अल्बम 30' गोळ्या वाटप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

सांगली, ः राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, सांगली शहर जिल्ह्यातर्फे सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायाकरीता "आर्सेनिक अल्बम 30' रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या गोळ्या, मोफत औषध, मास्क तसेच माहितीपत्रक घरटी वाटपाला सुरुवात प्रभाग क्रमांक सोळा मधून करण्यात आली. महापालिका सहाय्यक आयुक्त पराग कोडगुले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्याहस्ते वाटपास सुरुवात झाली. 

शहर जिल्हाध्यक्ष बजाज म्हणाले की, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून अभियान सुरू केले आहे. युवक राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष राहुल पवार म्हणाले की, कोरोना विषाणूच्या विरोधात लढत असताना नागरिक मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा अन्य आजाराशी झगडत आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार करून राष्ट्रवादी युवकने अभियान सुरू केले आहे. कुटुंबातील प्रत्येकाची माहिती संकलित करुन आजारी नागरिकांना मोफत उपचार, शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या जातील. महापालिका सहाय्यक आयुक्त पराग कोडगुले म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अभियानाचे आम्ही स्वागत करतो. संकलित केलेल्या माहितीचा फायदा मनपाला नक्की होईल. 

नगरसेवक शेडजी मोहीते, माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी, मुस्ताक रंगरेज, अल्पसंख्याक सेल शहरजिल्हाध्यक्ष आयुब बारगीर, शुभम जाधव, शुभम ठोंबरे, ऋषिकेश कांबळे, राव नलवडे, शिवराज कदम, राहुल गुरव उपस्थित होते. 
 
.................. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP distributes free "Arsenic Album 30" tablets here