ब्रेकिंग - राष्ट्रवादीच्या नेत्याचा भोसकून खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती, श्री महांकाली साखर कारखान्याचे संचालक मनोहर पाटील यांचा अज्ञातांनी निर्घृण खून केला. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास देशिंग - बोरगाव या वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडला. त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येते.

सांगली -  कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती, श्री महांकाली साखर कारखान्याचे संचालक मनोहर पाटील यांचा अज्ञातांनी निर्घृण खून केला. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास देशिंग - बोरगाव या वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडला. त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येते.

जखमी पाटील यांना तातडीने मिरज येथे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. 
पाटील यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यानंतर व पाटील यांचा मृत्यू झाल्याचे समजताच तालुक्‍यात व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गावांत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की देशिंग-बोरगाव रस्त्यावर माजी सभापती पाटील कोणाशी तरी चर्चा करीत रस्त्यावर उभे होते. त्यावेळी अज्ञातांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मिरज येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती समजल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व घटनेची पोलिसांत नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

पाटील यांचे मूळ गाव कवठेमहांकाळ तालुक्‍यातील हरोली आहे. सुरवातीपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते असलेल्या पाटील यांनी प्रारंभी हरोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच झाले. सांगली बाजार समितीची निवडणुकही लढवली होती. सन 2017 मध्ये पंचायत समितीची निवडणूक लढवली. मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आल्यानंतर ते पंचायत समितीचे सभापती झाले. श्री महांकाली साखर कारखान्याचे ते संचालकही होत. नानासाहेब सगरे ऊस तोडणी वाहतूक पतसंस्थेचे ते अध्यक्ष होत. तालुक्‍यातील वाहनधारक मालक संघटनेची त्यांनी बांधणी केली होती. 

दोन संशयित ताब्यात 

दरम्यान, रात्री उशिरा हल्लेखारांपैकी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. खुनाचे नमेके कारण अद्याप समजले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader murder in sangali kavtemahnkal