esakal | रोहित पवार म्हणाले, आत्ता बास झालं; पवारांवरील टीकेनंतर संताप
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar, Sharad Pawar

गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांचं कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो.

रोहित पवार म्हणाले, आत्ता बास झालं; पवारांवरील टीकेनंतर संताप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांचे नातू रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत गरज पडली की साहेबांचा सल्ला घ्यायचा आणि निवडणुकीची वेळ आली की साहेबांनी काय केलं असे विचारायचे म्हटले आहे.

सोलापुरमध्ये झालेल्या जाहीर सभेत अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. लोकसभा निवडणुकीवेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांवरच टीका केली होती. त्याबद्दल आता रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी लिहिले आहे, की गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांचं कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत. पण आत्ता बास झालं. कधी कुठे आणि कशी सुरुवात करायची, लवकरच ठरवू.

loading image
go to top