Congress ने दावा केलेल्या 'या' दोन्ही मतदारसंघांवर आता जयंत पाटलांचाही दावा; कोण घेणार माघार? पवारांच्या भूमिकेकडं लक्ष

'मंत्री मुश्रीफ यांना शरद पवारांबद्दल आदर आहे, यात शंका घेण्याचं कारण नाही'
LokSabha Election Jayant Patil
LokSabha Election Jayant Patilesakal
Summary

शरद पवार यांच्या राज्यभर सभा होणार असून सर्व संभ्रम दूर होतील. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत आपणास काही माहिती नसल्याचे आमदार पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. येथील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने लढावे, अशी आमची इच्छा असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या दोन्ही मतदारसंघांवर दावा केला.

LokSabha Election Jayant Patil
NCP Crisis : पुन्हा नव्याने संघटना उभारण्यासाठी अजितदादा मैदानात; कोण-कोण लागणार गळाला? उत्सुकता शिगेला

शाहू- फुले- आंबेडकर यांचे पुरोगामी विचार घेवून ज्येष्ठ नेते शरद पवार काम करत आहेत. मात्र, ज्यांना हे विचार मान्य नाहीत, त्यांनी पवारांपासून फारकत घेतली असल्याची टीकाही त्यांनी केली. शुक्रवारी (ता. २५) दसरा चौक येथे शरद पवार यांची सभा होत आहे. सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले असता आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार व अजित पवार यांच्या वारंवार होणाऱ्या‍ भेटीबाबत बोलताना आमदार पाटील म्‍हणाले, ‘गेली अनेक वर्षे एकत्र असणारे लोक, नेते पक्षापासून बाजूला गेले आहेत. ते शरद पवार यांना भेटण्यासाठी येतात. मात्र ते भेटले म्‍हणजे त्यांचे विचार मान्य केले, असे होत नाही.

LokSabha Election Jayant Patil
Mahadev Jankar : सत्तेची घमेंड त्यांच्या डोक्यात शिरलीये, काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार; जानकरांचा घणाघात

शरद पवार यांच्या राज्यभर सभा होणार असून सर्व संभ्रम दूर होतील. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत आपणास काही माहिती नसल्याचे आमदार पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, माजी आमदार राजीव आवळे, नितीन जांभळे, रोहित पाटील, सरोजिनी जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

मुश्रीफ यांना पवारांबद्दल आदर

मंत्री मुश्रीफ यांना शरद पवारांबद्दल आदर आहे. यात शंका घेण्याचे कारण नाही. मात्र त्यांनी अशी भूमिका का घेतली, हे सांगू शकत नाही. सभा होत जातील तसे शरद पवार याबद्दल बोलतील. शुक्रवारी (ता. २५) होणाऱ्या‍ सभेतही ते आपली भूमिका स्‍पष्‍ट करतील, असे पाटील यांनी सांगत जणू सभेचा ट्रेलरच स्‍पष्‍ट केला आहे.

LokSabha Election Jayant Patil
Prithviraj Chavan : 'वंचित'मुळे काँग्रेसचे अनेक खासदार पडले आणि त्याचा भाजपला फायदा झाला; चव्हाणांचा आंबेडकरांवर गंभीर आरोप

फुटून गेलेल्यांना लक्ष्य नाही

पाटील म्हणाले, ‘ राष्‍ट्रवादीतून फुटून गेलेल्यांना लक्ष्य करण्यासाठी शरद पवार यांच्या सभा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. यात काही तथ्य नाही. श्री.पवार यांच्या सभेबाबत संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरु आहे. संबंधित जिल्‍ह्यातील कार्यकर्त्यांनी सभा घेण्याचा आग्रह केल्याने सभा घेतल्या जात आहेत. कोणाच्याही मतदारसंघात सभा झालेल्या नाहीत. जिल्‍ह्यात सभा होत आहेत.’

तलाठी परीक्षेत घोटाळा झाल्याची शक्यता

तलाठी परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांना बसू दिलेले नाही. ही गंभीर बाब आहे. राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावर गोंधळ झालेला आहे. या परीक्षेत काहीतरी घोटाळा झाल्याचे दिसत आहे. सरकारने यामध्ये सुस्पष्टता आणण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com