'माझं वय 23 आहे, 25 वर्षाचा होईपर्यंत विरोधकांकडं काहीच ठेवत नाही'

माझं वय 23 च आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही - रोहित पाटील
'माझं वय 23 आहे, 25 वर्षाचा होईपर्यंत विरोधकांकडं काहीच ठेवत नाही'
Updated on

शिरढोण - राजकीय वर्तुळात नेहमीच काही ना काही घटना, किस्से यांची चर्चा सुरु असते. आरोपप्रत्यारोप आणि टीकाटिपण्णी सोबत कधी 'तुझ्या गळा, माझ्या गळा' अशा नाट्यमय घटना घटत असतात. सध्या अनेक जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. यामुळे राजकीय नेत्यांचे विविध ठिकाणी दौरे सुरु आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या रोहित पाटील हे ही नगरपंचायतीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. त्यांनी एक ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, 25 वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? माझं वय 23 च आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही असं म्हणत त्यांनी जिल्ह्यातील विरोधकांना इशारा दिला आहे. दरम्यान सांगलीतील कवटेमहांकाळ परिसरात काल त्यांचा दौरा होता. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान ते यावेळी म्हणाले, तेवीस वर्षाच्या युवकाच्या विरोधात येऊन निवडणूक लढवावी लागते, हा या दिग्गज नेते मंडळीचा नैतिक पराभव आहे. शहराचा विकासाच्या कायापालट हेच माझे ध्येय असून कवठेमहांकाळ मधील ही स्वाभिमानाची निवडणूक आहे. दोन वर्षात विरोधकांचा सुपडा साफ करणार असा इशारा युवा नेते रोहित पाटील यांनी दिला. प्रचार शुभारंभप्रसंगी त्यांना केलेल्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या त्यांच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहे. नगरपंचायतीच्या या तापलेल्या राजकीय वातावरणात त्यांच्या या ट्विटमुळे विरोधकांनीही कान टवकारले आहेत. आता हा टोला कुणाला लगावला हे मात्र अस्पष्ट आहे.

'माझं वय 23 आहे, 25 वर्षाचा होईपर्यंत विरोधकांकडं काहीच ठेवत नाही'
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं; सख्खे 4 भाऊ 'आमदार'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is Sagareshwar Wildlife Sanctuary famous?
Why are women paying extra for NCMC cards?
Devendra Fadnavis Sunil Tatkare Jayant Patil meeting
Who is Tukaram Mundhe?
Marathi News Esakal
www.esakal.com