डॉक्‍टरांच्या कामाचे ऑडीट करण्याची गरज...पालकमंत्री जयंत पाटील यांचा डोस...वाढत्या मृत्यूदराबाबत चर्चा आवश्‍यक 

बलराज पवार
Sunday, 20 September 2020

सांगली- कोविड आपत्तीच्या काळात अनेक डॉक्‍टरांच्या कारभाराबाबत उघड नाराजी व्यक्‍त होताना दिसते. त्यामुळे फक्त पैशाचे नव्हे तर डॉक्‍टरांच्या कामाचे ऑडीट होण्याची गरज आहे. मृत्यूदर का वाढतोय यावर चर्चा होणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथे केले. 

सांगली- कोविड आपत्तीच्या काळात अनेक डॉक्‍टरांच्या कारभाराबाबत उघड नाराजी व्यक्‍त होताना दिसते. त्यामुळे फक्त पैशाचे नव्हे तर डॉक्‍टरांच्या कामाचे ऑडीट होण्याची गरज आहे. मृत्यूदर का वाढतोय यावर चर्चा होणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथे केले. 

दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने चोपडे मेमोरियल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्‌घाटन आज पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ""सध्या अनेक खासगी रूग्णालयाकडून रूग्णांची लूट सुरू असल्याच्या तक्रारी कानावर येत आहेत. रूग्णालयामध्ये लूट होत असल्यामुळे अनेक रूग्ण उपचारासाठी दाखल होणे टाळत आहेत. दुखणे अंगावर काढत आहेत. लुटीच्या भितीने कोणी रूग्णालयामध्ये दाखल होत नसल्याचे चित्र आहे. मात्र रूग्ण अत्यवस्थ झाला तर रूग्णालयात उशिरा दाखल केले जाते, त्यानंतर उपचार सुरू असताना मृत्यू होतो. अनेक ठिकाणी डॉक्‍टर कोविड रूग्णांना भेटतच नाहीत. बाहेरूनच चर्चा करतात. वास्तविक डॉक्‍टरांनी रूग्णांना भेटले पाहिजे. डॉक्‍टर आतमध्ये जात नसतील तर उपचार कसे होणार? हा प्रकार गंभीर आहे. आतापर्यंत मी कधी या विषयावर बोललो नाही. परंतू मृत्यूदर वाढतच चालला आहे. त्यामुळे यावर बोललो. डॉक्‍टरांनी रूग्णांची काळजी घेतली पाहिजे. तरच मृत्यूदर कमी होईल. पैशाचे ऑडीट नव्हे तर सध्या डॉक्‍टरांच्या कामाचे ऑडीट करण्याची गरज आहे. डॉक्‍टरांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी चर्चा होणे आवश्‍यक आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need to audit the work of doctors. Guardian Minister Jayant Patil's dose. Need to discuss rising mortality rate