रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज- डॉ. कल्याण गंगवाल

राजकुमार थोरात
Monday, 11 June 2018

वालचंदनगर - आजच्या जीवनशैलीमध्ये ‘रोगापेक्षा उपचार अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली असुन, यावरती मात करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय शाकाहार व अहिंसा प्रसारक डॉ.कल्याण गंगवाल यांनी केले. वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे सन्मती मंडळाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी डॉ.वसंत दगडे उपस्थित होते. 

यावेळी डॉ. गंगवाल यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती आणि जीवन पध्दत आरोग्याची गुरुकिल्ली आहेत. रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी संयमी, शिस्तबद्ध आणि त्याग प्रवृत्तीचे अधिकाधिक अनुकरण करावे. प्रत्येकाने औषधांचा अति वापर टाळणे हितकारक आहे. नैसर्गिक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी शिस्तबद्ध शुध्द आहाराचे आणि नियमित स्वाध्याय व व्यायामाचे गुण जोपासावेत. एकमेकांच्या सुसंवादाने अनेक समस्या  सहज सुटू शकतात.

मधुमेह, रक्तदाब, मेंदूच्या आजारावरती सुसंवाद हे पहिले औषध आहे. भारताच्या खेड्यात राहणाऱ्या शेतकरी, कष्टकरी लोकांच्या आहार व विहार पध्दतीला वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक तज्ञांनी मान्यता दिली आहे. संयमी जीवन मानसिक आणि शारीरिक समाधानाचे महत्त्वाचे अंग आहे. धार्मिकता हे थोतांड नसुन जगण्याची पध्दत शिकविणारी मुक्त शाळा आहे. माणसाचा मुलभूत आहार शाकाहार आहे. सदाचाराने सामाजिक सलोखा कायम राहतो. तर अहिंसा विचार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सलोखा निर्माण करू शकतो. आजची तरुण पिढी बुध्दी वादी आहे. मात्र तरुणांच्या जीवन पध्दतीची दिशा भरकटत चालली आहे. 

वाढत्या बाजरीकारणामुळे अनेक विकृती वाढत आहेत. योग्य साधू संतांचा सहवास आणि संयमी जीवन हे जीवनाचे सूत्र असावे असे डॉ. गंगवाल यांनी सांगितले. 
यावेळी सन्मती मंडळाच्या वतीने डॉक्टर गंगवाल यांना मानपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सशांतकुमार गांधी व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विकास शहा यांनी मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The need to increase immune system- Dr. Kalyan Gangwal