तरूणाईत राजकीय सजगतेची गरज 

swapnil_joshi_org.jpg
swapnil_joshi_org.jpg

सांगली ः मतदान आपण कोणाला करतो. निवडून कुणाला देतो, यात आजची तरूणाई अनभिज्ञ असते. त्यामुळे आजच्या तरूणाईत राजकीय सजगता महत्वा व गरजेची आहे, असे स्पष्ट मत प्रख्यात अभिनेते स्वप्निल जोशी यांनी येथे व्यक्त केले. श्री. जोशी यांनी सांगली "सकाळ' च्या सांगली विभागीय कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी संवाद साधाला. "सकाळ' चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी स्वागत केले. 


ते म्हणाले,""कोणत्याही राजकीय नेतृत्वाखाली आपण फॉलो करीत आहोत. असे न राहता त्यांची ध्येय धोरणे, विकासात्मक भूमिका आणि प्रगतीचे विचार या सर्व गोष्टींबाबत सजग असायला हवे. त्यात कोणताही पक्ष किंवा नेतृत्व असो. त्याचा सारासार विचार करायलाच हवा.'' 

मराठी चित्रपटांच्या भूमिकेबाबत बोलतांना ते म्हणाले,""मराठी चित्रपट सृष्टीला चांगले दिवस येत आहेत. मोठ्या प्रमाणावर व्यवसायही होत आहे. महाराष्ट्रीयन संस्कृतीतील जगणं, चाली रीती, कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध याविषयी आजही भाष्य करणारे चित्रपट येत आहेत, त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता मराठी चित्रपट सृष्टी विस्तारत चालली आहे. रंगभूमीवर नाटक जिवंत ठेवण्यासाठी त्यासाठी खास प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याचे नाट्यगृहांची दुरवस्था झाली आहे. त्याठिकाणी नाटक वगळता चित्रपटही दाखवले तर उत्पन्न वाढेल. पण, प्राधान्य हे नाटकांनाच राहिले, यावर शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.'' 

वेबसिरीजविषयी ते म्हणाले,""वेबसिरीजलाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. वेबसिरीजचा फायदा म्हणजे केंव्हाही कधीही कितीही वेळेपुरती पाहता येते. इथे सेन्सॉरशीप नसली तरी कलाकार आणि रसिकांना सेल्प सेन्सॉरशीप गरजेची आहे. एखादी सिरीज आवडली नाही, तर ती बंद करता येते. या वेबसिरीज ऐच्छिक आहेत. त्यामुळेच त्याचे प्रस्थ वाढत आहे. माझी स्वतःची "समांतर' नावाची वेबसिरीज लवकरच येत आहे.'' 

अलीकडच्या काळात कलाकार काही मुद्‌द्‌यांवर राजीनामे देणे, पुरस्कार परत करणे असे निर्णय घेत आहेत त्यावर ते म्हणाले,""हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्‍न आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही.'' 

"ट्रोल'कडे दुर्लक्ष करा..! 
स्वप्निल जोशी म्हणाले,""सामाजिक, राजकीय घटना-निर्णयाबाबत कलाकारांनी घेतलेल्या भूमिकेवरून हल्ली सोशल मिडियावरून "ट्रोल' केले जात आहे. त्यामुळे कलाकारांनी अशा "ट्रोल' कडे दुर्लक्षच करायला हवे.'' 

 

जूनी गाणी ऐकतो 
ताणतणाव आल्यानंतर आपण काय करता असा प्रश्‍न मिरजेच्या डॉ. विनोद परमशेट्टी यांनी विचारला. यावर श्री. जोशी म्हणाले,""मी मुलांत रमतो. त्यांच्यासोबत खेळतो. पुस्तके वाचतो. जुनी हिंदी-मराठी गाणी ऐकतो.'' 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com