.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सांगली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात येणारी वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक ‘नीट २०२५’ची पात्रता परीक्षा यंदाही ऑफलाईनच होणार आहे. गतवर्षी झालेल्या गोंधळानंतर या परीक्षेतील त्रुटी दूर करण्यासाठी नेमलेल्या समितीने ही परीक्षा ऑनलाईन घेण्याची शिफारस केली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी ही परीक्षा ऑफलाईन अशी एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.