
सांगली : ‘नीट’ परीक्षेसाठी अर्ज करताना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना केंद्रीय जातीचा दाखला आवश्यक केला आहे. दाखला नसेल त्यांनी संबंधित विभागाकडे दाखल्यासाठी अर्ज केल्याची पोचपावती ‘नीट’साठी अर्ज करताना सादर करावी लागणार आहे. केंद्रीय जातीच्या दाखल्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असते.