
बेळगाव : पावसामुळे नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बेळगाव : मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गेल्या दोन महिन्यात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अनेक शाळांच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. मात्र या शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे यावेळी दुसऱ्या ठिकाणी शाळा भरविण्याची वेळ काही गावांमधिल शाळांवर येणार आहे. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या पडण्याचे प्रकार पहावयास मिळाले होते. त्यामूळे अनेकाना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. तसेच बेळगाव, खानापूर तालुक्यासह विविध भागातील सरकारी प्राथमिक शाळांच्या छताचे नुकसान झाले होते. त्यानंतर शिक्षण खात्याने ज्या शाळांचे नुकसान झाले आहेत त्या शाळांची माहिती देण्याची सूचना सीआरपीना दिली होती.
शाळांच्या नुकसानीचा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर शिक्षण खात्याने तातडीने पावले उचलत ज्या शाळांचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करणे गरजेचे होते. परंतू अद्याप कोणत्याही प्रकारच्या हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत असून शिक्षण खात्याने विलंब केल्यामुळे यावेळी काही शाळा समुदाय भवन, मंदीर किंवा इतर ठिकाणी भरवाव्या लागनार आहेत.
2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. यापैकी अनेक शाळांचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून कोरोनाचे कारण देत शाळांच्या विकासासाठी पुरेसा निधी वेळेत देण्यास विलंब करण्यात आला होता. त्यामूळे अजून पर्यंत 25 टक्के शाळांचे काम पुर्ण झालेले25 नाही. त्याचाही फटका विद्यार्थांना बसणार असून गेल्या वर्षी प्रमाणे पावसाळ्यात जागा शोधण्याची वेळ शाळांवर येणार आहे.
Web Title: Neglecting Repair Of Schools Damaged By Rains Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..