esakal | वांगीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा...ग्रामस्थांचा निष्काळजीपणा, कोरोनाच्या रूग्णसंख्ये मोठी वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA.jpg

वांगी( सांगली)-  कडेगांवनंतर लोकसंख्येने सर्वात मोठे गाव असलेल्या वांगीमध्ये "कोरोना" च्या गांभीर्याचा फज्जा उडाल्याने दररोज कमी-अधिक रुग्ण सापडत आहेत. प्रारंभी पोलिसांच्या धास्तीने वापरात असलेले मास्क व सॅनिटायझर लोकांनी अडगळीत टाकले आहेत. गावात सध्या सोशल डिस्टन्सिंगची "ऐशी की तैसी" दिसून येत आहे. आम्हाला कुठला रोग होतोय ?" या घमेंडीत नागरीक वावरत आहेत. 

वांगीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा...ग्रामस्थांचा निष्काळजीपणा, कोरोनाच्या रूग्णसंख्ये मोठी वाढ 

sakal_logo
By
रवींद्र मोहिते

वांगी( सांगली)-  कडेगांवनंतर लोकसंख्येने सर्वात मोठे गाव असलेल्या वांगीमध्ये "कोरोना" च्या गांभीर्याचा फज्जा उडाल्याने दररोज कमी-अधिक रुग्ण सापडत आहेत. प्रारंभी पोलिसांच्या धास्तीने वापरात असलेले मास्क व सॅनिटायझर लोकांनी अडगळीत टाकले आहेत. गावात सध्या सोशल डिस्टन्सिंगची "ऐशी की तैसी" दिसून येत आहे. आम्हाला कुठला रोग होतोय ?" या घमेंडीत नागरीक वावरत आहेत. 

"कोरोना" पुढे संपूर्ण जगाने हात टेकले आहेत. यावर कोणतेही प्रभावी औषध निर्माण न झाल्याने "काळजी हाच प्रतिबंध" हे सूत्र अवलंबीले तर कोरोनापासून बचाव शक्‍य आहे. मात्र वांगी (ता. कडेगाव) परिसरांतील लोक यासंदर्भात घ्यावयाच्या काळजीसही कंटाळल्याचे दिसत आहे. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान कोरोनासंदर्भात असणारे गांभीर्य लोकांमध्ये उरलेले नाही.

वांगीतील सर्व व्यवहार वेळेपूर्वी आणि वेळेनंतरही सुरु ठेऊन व्यापारी वर्गाकडून कोरोनाला "चॅलेंज" केले जात आहे. तालुका प्रशासन, ग्रामपंचायत आणि दक्षता कमिटी यांचेकडून सातत्याने लोकांना सूचना करुनही लोक आपल्या मर्जीनूसार वागत आहेत. काही लोक तोंडाला मास्क लावण्याचे नाटक करीत आहेत. सॅनिटायझर वापर पूर्णतः बंद झाला आहे. सर्व प्रकारच्या उद्योग, व्यापार व व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी करुन "सोशल डिस्टन्सिंग" पायदळी तुडविले जात आहे. 

वांगी परिसरांतील लोकांना वारंवार विनंत्या करुन, भिती दाखवून आपला बचाव करण्याचे आवाहन केले. मात्र पोलिस गाडी दिसली की तात्पुरते नाटक केले जाते. व पोलिसांना कसे फसविले असा गोड गैरसमज लोक करुन घेतात. मरणाची भिती नसेल तर किती समजवणार ? आणि काय सांगणार ?..... 

-संतोष गोसावी (सहायक पोलिस निरीक्षक)