दुबईवरून आलेल्या शेजाऱ्याने बॅग घरात ठेवली अन...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

दुबई येथून एक जण आला, घरात कोणी नसल्याने त्यांनी त्याची बॅग शेजारील घरात ठेवून तो त्याच्या कर्नाटकातील मूळ गावी गेला; पण दुबईतून आलेल्या व्यक्तीने आणलेली बॅग घरात ठेवली आहे, उद्या काय झाले तर काय करायचे? या धास्तीने या कुटूंबियांने अख्खी रात्र जागून काढली.

जत ः देशात दहशत निर्माण करणाऱ्या "कोरोना' व्हायरसने सर्वांची झोप उडवली आहे. याच "कोरोना'ची भीती जतमध्येही चांगलीच आहे. दुबई येथून एक जण आला, घरात कोणी नसल्याने त्यांनी त्याची बॅग शेजारील घरात ठेवून तो त्याच्या कर्नाटकातील मूळ गावी गेला; पण दुबईतून आलेल्या व्यक्तीने आणलेली बॅग घरात ठेवली आहे, उद्या काय झाले तर काय करायचे? या धास्तीने या कुटूंबियांने अख्खी रात्र जागून काढली.

तालुक्‍याच्या कर्नाटक सीमेवर असलेल्या एका गावात ही घटना घडली. बुधवारी रात्री अचानक दुबईवरून एकजण जतला आले. त्यांची पत्नी गावकडेच गेल्याचे त्यांना समजले. त्यांनी त्यांची बॅग शेजारच्या घरात ठेवून आपल्या मूळ गावी जातो असे सांगून गेले. एक तर शेजारी, त्यात त्यांची पत्नी घरी नसल्याने त्या शेजाऱ्याने बॅग घरी ठेवून घेतली खरी; पण थोड्या वेळाने त्यांना परदेशातील "कोरोना' व्हायरस आठवला व त्यांची पाचावर धारण बसली.

जी व्यक्ती बॅग ठेवून गेली आहे ती नुकतीच दुबईवरून आली आहे. दुबईवरून आलेले पुणे येथील तिघांना "कोरोना' झाला असल्याचे वृत्त समजल्याने त्यांना आता ने A neighbor came from Dubai puts the bag in the house and...मके काय करावे? हे सूचेना. भितीने त्यांची चांगलीच गाळण उडाली. 

आरोग्य यंत्रणेकडून दखल 
बॅग ज्या खोलीत होती त्याच्या जवळही जायचे धाडस कोणी करेना. अखेर त्यांनी ही बाब नगरसेवकांच्या कानावर घातली. त्यानंतर ही बाब आरोग्य विभागाला सांगितली. आरोग्य विभागाने तातडीने भेट दिली; पण तेथे दुबईवरून आलेली व्यक्ती तिथे नव्हता. तपासणी केली असता "कोरोना'चा एकही रूग्ण आढळला नाही. आरोग्य विभाग व नगरसेवकांनी त्या कुटूंबीयांना धीर देत त्यांच्या मनातील भीती दूर केल्यानंतर त्या कुटूंबियाला हायसे वाटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A neighbor came from Dubai puts the bag in the house and...