नेलकरंजी ग्रामस्थांनी स्वतःच पूल दुरुस्त करून वाहतूक केली सुरू 

हमीद शेख
Saturday, 24 October 2020

नेलकरंजी-खरसुंडी रस्त्यावरील पूल पावसाने वाहून गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. यावर नेलकरंजीच्या ग्रामस्थांनी पूल दुरुस्त करून वाहतूक सुरू केली आहे. दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने हे शक्‍य झाले आहे. 

खरसुंडी : नेलकरंजी-खरसुंडी रस्त्यावरील पूल पावसाने वाहून गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. यावर नेलकरंजीच्या ग्रामस्थांनी पूल दुरुस्त करून वाहतूक सुरू केली आहे. दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने हे शक्‍य झाले आहे. 

नेलकरंजी-खरसुंडी रस्त्यावरील पूल पावसामुळे गेल्या आठवड्यात वाहून गेला होता. नेलकरंजीच्या काही ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन वाहून गेलेल्या पुलावर भराव टाकून तात्पुरती दुरुस्ती केली आणि आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. एक आठवड्यानंतर हा मार्ग सुरू झाला आहे. या मार्गावर अवलंबून असणारी 27 गावे आहेत. या सर्व गावच्या नागरिकांना हाच मार्ग सोयीचा आहे. हा मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. 

गेली दोन दिवसापासून पावसाने थोडी उघडीप दिली आहे. आटपाडी व सांगलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा महत्त्वाचा असणारा पूल पावसात वाहून जाणार नाही. त्याची दखल घेऊन चांगल्या प्रकारे तयार करण्याची मोठी गरज आहे. त्या स्थितीत जर पूल केला तर कधीही मोठ्या पावसात हा पूल राहू शकत नाही. या ओढ्यावर असणारे पाणलोट क्षेत्राचा विचार करून या पुलाची उंची व पाईपलाईनची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्याचबरोबर या पूलास वळण असल्यामुळे पुलावर पाण्याचा मोठ्या प्रमाणात दाब येऊन पूल वाहून जात आहे. याचा विचार करून या पुलाचा नवीन प्रस्ताव तयार करण्याची बांधकाम खात्यास गरज आहे.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nelkaranji villagers repaired the bridge themselves and started transporting