
अथणी - बेळगावपासून २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या अथणी येथे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या प्रयत्नाने प्रादेशिक वाहतूक कार्यालय (आरटीओ) मंजूर झाले आहे. येथील कार्यालयाला ‘केए ७१’ क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे अथणीला ही नवी ओळख मिळाली आहे. लवकरच कार्यालयाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे बेळगाव, चिक्कोडीचे हेलपाटे आता थांबणार आहेत. आता नागरिकांना येथे प्रांत कार्यालयाची प्रतीक्षा लागली आहे.
अथणी तालुका महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. येथे कृषी उद्योगाचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यात वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षापासून येथे आरटीओ कार्यालयाची मागणी होती. परंतु वारंवार कार्यालयाच्या मंजुरीचे काम रेंगाळले होते. अखेर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या प्रयत्नाने कार्यालयास मंजुरी मिळाली आहे. इमारत पूर्ण होण्यापूर्वी भाडे तत्वावर इमारत घेऊन कार्यालय सुरु होणार आहे. येथे वाहन नोंदणी, वाहन परवान्यासह इतर कामे होणार आहेत. कार्यालयास लवकरच जागा शोधून कामाला सुरुवात होणार आहे. कार्यालय झाल्याने विविध समस्या निकालात निघणार आहेत.
अथणी तालुक्यात १२० गावे होती. त्यातील ३२ खेडी नवीन कागवाड तालुक्यात समाविष्ठ केली आहेत. आता ८८ खेडी अथणी तालुक्यात आहेत. बेळगाव जिल्ह्यात हा सर्वाधिक मोठा तालुका आहे. नवीन डीवायएसपी कार्यालय सुरु असून प्रांत कार्यालयाची मागणी होत आहे. त्याचाही प्रस्ताव शासन दरबारी आहे. महसूल व जमीन व्यवहाराच्या कामासाठी चिक्कोडीला जावे लागत आहे. त्यासाठी येथे नवीन प्रांत कार्यालयाची गरज आहे. हा तालुका सांगली, विजापूर जिल्ह्याशी लागून आहे. तेलसंग महसूल विभागातील शेतकऱ्यांना जमिनीच्या कामासाठी सुमारे १४० किलोमीटर अंतरावर जावे लागत आहे. हे कार्यालय अथणीत झाल्यास महसूल विभागाचा प्रश्न निकालात निणार आहे. इतरही महत्त्वाची कार्यालये मंजूर करण्याची मागणी आहे. राज्याचा शेवटचा तालुका असून तीन विभागातील समस्या मिटणार आहेत. ग्रामीण, शहर पोलिस ठाण्याला शासकीय अनुमती मिळाली असून ती प्रत्यक्षात आणण्याची मागणीहोत आहे.
अथणी, रायबाग तालुका कार्यक्षेत्र
अथणी व रायबाग तालुक्यातील अथणी, कागवाड, कुडची व रायबाग या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश अथणी आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांचे हेलपाटे वाचणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.