मार्केट यार्डात हंगामातील बाजार समितीत राजापुरी (स्थानिक) हळदीची ३ हजार ८१३ पोत्यांची (एक पोते ५० किलोचे) आवक झाली.
सांगली : वसंतदादा मार्केट यार्डात (Vasantdada Market Yard) यंदाच्या हंगामातील नवीन मुहुर्तावरील हळद (Turmeric Price) सौद्यास सुरवात झाली. जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे यांच्या हस्ते नव्या हळदीच्या सौद्यास सुरवात झाली. नव्या हळदीला प्रतिक्विंटल २१ हजार ३०० रुपये दर मिळाला.